औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने चक्क नापास विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या बीसीए या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठांनी महाविद्यालय पाठवली आहेत, त्यात दोन नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पदव्या बहाल केल्या.


खासगी कंपनीकडे डेटा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, विद्यापीठाने मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रमाणपत्र वाटप यावर्षी पहिल्यांदाच महाविद्यालयामार्फत होत आहे. मे महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात केवळ पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र महाविद्यालय पाठवण्यात आली होती. शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा होण्यापूर्वीच अर्ज ऑनलाईन भरुन घेतले होते. त्याचा डेटा प्रथमच पुण्यातील एका खाजगी कंपनीला पाठवण्यात आला होता. कारण त्या कंपनीला प्रमाणपत्र छपाईचे काम देण्यात आले होते.


शैक्षणिक वर्तुळात जोरदार खळबळ


विद्यापीठाकडून घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे विद्यापीठावर टीकेची झोडही उटली आहे.