शेतात काम करणाऱ्या आदिवासी मुलांची आवाक करणारी कामगिरी, राष्ट्रपतींकडुन कौतुक
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मुलांचा सत्कार करत कौतुक केले.
मुंबई : मिशन शौर्यच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १० आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट चढाई मोहीम फत्ते केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मुलांचा सत्कार करत कौतुक केले. एव्हरेस्ट सर करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. यात तीन मुलींचा समावेश आहे. शेतात काम करत असताना या मुलींनी एव्हरेस्टवर जाण्यासाठी प्रशिक्षण घेतलं.