Eknath Shinde Vs. Shiv Sena, मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या वादात आता धक्कादायक ट्विस्ट आला आहे. दिल्ली हायकोर्टाने(Delhi high Court)  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला(Shiv Sena Balasaheb Thackeray Group) झटका देणारा निर्णय दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाचे निवडणुक आयोगाविरोधातील ठाकरे गटाची ही याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली आहे. शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद लवकर निकाली काढा असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने निवडणूक आयोगाला(Election Commission) दिले आहे. यामुळे पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन्हीबांबत निवडणुक आयोगच निर्णय देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. खरी शिवसेना आमचीच असा दावा शिंदे आणि ठाकरे गटाकडून करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने याचा निर्णय निवचणुक आयोगावर सोपवला. मात्र, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचे आदेश दिले. 


8 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवल्याचे जाहीर करत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असे निर्देश ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले होते. यामुळे दोन्ही गटांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणु वेगवगेळ्या चिन्हावर लढवली.  


चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका दिल्ली हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. दोन्ही पक्षांचे आणि जनतेचे हित लक्षात घेऊन हा या वाद तात्काळ सोडवावा असे निर्देश न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी दिले आहेत.  ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत तसेच एकनाथ शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील राजीव नायर आणि नीरज किशन कौल यांनी कोर्टात युक्तीवाद केला.