COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णाच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांची घट झाली आहे. खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडून साथीचा बागुलबुवा केला जात आहे, असा दावा मनपाच्या आरोग्य विभागानं केला आहे.


डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.


रुग्णांना ताप जरी आला तरीही खाजगी डॉक्टर्स डेंग्यू झाल्याचा बागुलबुवा करून महागडा औशोधापचार करत असल्याचा आरोप आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे, त्यासाठी त्यांनी काही आकडेवारी जारी केली आहे. 


सप्टेंबर २०१७ पर्यंत मनपा कार्यक्षेत्रात १७५ डेंगूचे रुग्ण आढळून आलेत. डेंग्यूमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून केला जात आहे. मागच्या वर्षी ६४० डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत यंदा रुग्णांमध्ये ६० टक्के घट झाली आहे. 


खाजगी दवाखान्यातून पाठविलेल्या रिपोर्ट पैकी केवळ एक त्रीतीआंश रुग्ण डेंग्यू बाधीत असल्याचे दाखले मिळत असल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने सारे आरोप फेटाळून लावले आहेत.


आरोग्य अधिकारीच  डॉक्टरांवर आरोप करत असल्याने  नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय.   


डेंग्यू बरोबर स्वाईन फ्लूनेही शहरात थैमान घातलंय. मनपाकडून स्वच्छता मोहिमेचा फार्स केला जातो. धूर फवारणीसाठी ६ मोठी आणि २८ लहान यंत्रे आहेत ६२ पथकाद्वारे  अळीनाशक फवारणी, पाणीसाठे तपासणी केली जात असल्यचा मनपाची कागदोपत्री दावा आहे. 


मात्र प्रत्यक्षात कधीच औषध आणि धूर फवारणी केली जात नाही त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. म्हणूनच मनपाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे मनपाचे रुग्णालयाचा दर्जा सुधारावा अशी मागणी केली होतेय.