Bageshwar Baba In Pune :   उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस बागेश्वर बाबाच्या दरबारात गेले. पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात  देवेंद्र फडणवीस  यांनी देखील हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी  बागेश्वर बाबाच्या गळ्यात हार घालून त्यांना हात जोडून अभिवादन केले. देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकात पाटील देखील बागेश्वर बाबाच्या दरबारात पोहचले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरबारात जाऊन फडणवीसांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली. हार आणि शाल घालून फडणवीसांनी बागेश्वर बाबाचा सत्कार केला. सनातन धर्म हा सगळ्यांना जोडणारा चिरंतन धर्म आहे, असं फडणवीसांनी म्हटलंय. 


पोलिस बागेश्वर बाबाच्या चरणी नतमस्तक


मंगळवारी वादग्रस्त धिरेंद्र शास्त्रींच्या पुण्यातील दरबारात सेवेवर तैनात पोलीस अधिकारी नतमस्तक झाल्याचं दिसले. कार्यक्रमस्थळी बंदोबस्तावर हे पोलीस अधिकारी होते. तिथे त्यांनी बागेश्वर बाबासमोर येऊन व्यथा मांडली. तर या प्रकरणाची चौकशी करुन योग्य कारवाईची मागणी अंनिसने केली आहे. 


बागेश्वरबाबांच्या कार्यक्रमाला फडणवीसांची दांडी


2 महिन्यापुर्वी नागपुरातही बागेश्वरबाबांचा कार्यक्रम भरवण्यात आला होता. तिथे फडणवीसांनी हजेरी लावली होती. त्यामुळे संभाजीनगरच्या कार्यक्रमात फडणवीस येतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र फडणवीसांनी ऐनवेळी दौरा रद्द केल्यानं चर्चांना उधाण आलंय.  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या पुढाकारातून शहरात धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा आणि दरबार भरवण्यात आला होता. 


बागेश्वर बाबाला अखिल भारतीय अंनिसने आव्हान


बागेश्वर बाबा म्हणजे थोतांड असून ते लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप अनिसनं केला. अंनिसचा आरोप बाबांना चांगलाच झोंबलाय. त्यामुळे बाबांच्या भक्तांनी नागपुरातील अंनिसच्या कार्यक्रमात जोरदार राडा केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं...अंनिसनं बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराला लक्ष्य केलंय.. देव-धर्माच्या नावाखाली लोकांची हातोहात फसवणूक केली जातेय. अशा बाबांवर कडक कारवाई करण्याची मागणी अंनिसनं केली. इतकच नाही तर बाबांनी चमत्कार सिद्ध केल्यास 30 लाखांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं. विशेष म्हणजे बागेश्वर बाबांनीही हे चॅलेंज स्वीकारलंय.