ऐतिहासिक शपथविधी आज पार पडला. राज्यात बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार स्थापन झालं आहे. अडीच वर्षात राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आपलं ठरलं. महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य समजतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी धन्यवाद देतो. अडीच वर्षात केंद्राचंही राज्याला मोठं पाठबळ मिळालं. लाडक्या बहिणींचं विशेष अभिनंदन करतो. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मनापासून अभिनंदन करतो. अजितदादांचं देखील मोठं योगदान मिळालं. अडीच वर्ष दोन्ही नेत्यांची साथ मिळाली. राज्यात वेगवान सरकारची कारकीर्द यशस्वी ठरली. सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचं बहुमत मिळालं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदेंनी सांगितला Dy CM चा खरा अर्थ!


मुख्यमंत्री असताना मी कार्यकर्ता म्हणून काम केलं. यापुढे देखील मी कार्यकर्ता म्हणून काम करणार. जेव्हा मी CM होतो तेव्हा मी Common Man समजत होते. पण आता मी DCM आहे. आता माझी जबाबदारी मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची आहे. म्हणजेच Dedicated to Common Man. यापुढे आम्ही एक टीम म्हणून काम करणार. मी मुख्यमंत्री असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जशी मदत केली तशीच मदत मी आता त्यांना करणार. त्यांना माझे पूर्ण सहकार्य आणि पूर्ण पाठिंबा असणार आहे. 


एकनाथ शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात उद्योजक, राजकीय नेते, विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांसह सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी साडेपाच वाजता शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला 40 हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाची टॅग लाईन 'महाराष्ट्र आता थांबणार नाही' अशी होती.