Devendra Fadnavis : देशात लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वातावारण चांगलेच तापले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे आहे.  मी पुन्हा येईल असं म्हटलं होतं. अडीच वर्षांनी का होईना पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी आम्हाला जिंकून दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला. 'काँग्रेस नसती तर काय झालं असतं?' या प्रश्नावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात जुंपली.  'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी बोलताना फडणवीसांनी केलेल्या टिकेला राऊतांनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिले. 


काँग्रेस पक्ष नसता तर काय झाल असतं यावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर 


काँग्रेस पक्ष नसता तर कदाचित भारताचे विभाजन झाले नसते. सामाजिक आर्थिक दरी निर्माण झाली नसती. आज पीएम मोदी यांच्या नेतृत्वात जागतिक स्तरावर आपली प्रतिमा झाली ती लवकर झाली असते. आज सशक्त राजकारण देश होताना दिसत आहे. महाराष्ट्राने सत्ता आणि पैसे आणि त्यावर राजकारण असे समीकरण केले. सरकारी पैशावर संस्था पैसा सत्ता काबीज केल्याचे दिसून आले. 


राज्यातील 50 कुटुंब जे राज्य राजकारण चालवतात. काहीजण सामाजिक इतिहास काम नक्कीच होते पण त्यातील काहीजण मात्र सत्ता कायम कंट्रोल ठेवण्यासाठी राजकारण करत होते.  आपल्या लोकांची मानसिकता झाली पण प्रमाण राजकारण काँगेस होते. घराणेशाही त्यांच्या पक्षात कायम दिसते. परिवारवाद अर्थ राजकारणात येऊ नये असे नाही तर त्याच्या जीवावर यावे, इतरांने अन्याय करत परिवारात फक्त संधी नको इतकेच.  खरगे अध्यक्ष पार्टीचे पण निर्णय सोनिया अथवा राहुल गांधी घेतात. काल अमित शाहा यांनी सांगितले एनसीपी का फुटली तर अजित पवार एवजी मुलगी पुढे आली. आदित्य ठाकरे यांचे ही तसच झाले. विचार सोडून सत्ता काबीज करण्यासाठी मुलांना संधी दिल्या.