प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी ओबीसी समाजही आता एकवटला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी 16 जूनपासून मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान त्यांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपती यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षणावरुन राज्यात सध्या वातावरण तापलं असल्यानं या भेटीकडे सर्वांचं लक्ष होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली.  बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं.


मराठा समाजाने स्वताच्या पायावर ठामपणे उभं राहिले पाहिजे. भेटीदरम्यान मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अशी विनंती उपमुख्यमंत्र्यांना केली. अजित पवार यांनी आरक्षणाचा मुद्दा आत्ता केंद्राच्या अखत्यारीत आहे पण इतर मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. 



आण्णासाहेब पाटील आर्थिक  मागास विकास महामंडळाकडून दिली जाणारी कर्ज मर्यादा वाढवावी अशी मागणी मराठा समाजाच्या प्रतिनिधी यांनी केली. आरक्षणाचा मुद्दा सोडून तर मुद्यावर अजित पवार सकारात्मक असल्याचे दिसून आलं. तर अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या भेटीत आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राच्या अखत्यारीत असल्याबाबत मत त्यांनी व्यक्त केलं.