खालापूर : डेरा सज्जा सौदाचे बाबा राम रहीम यांच्या खालापुरातील फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणातील पंचकुला येथील सीबीआय कोर्टानं बलात्काराच्या आरोपामध्ये राम रहीमला दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर राम रहीमच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड केली. या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.


मुंबई-पुणे जुन्या मार्गावर खालापुरातील कलोते इथं २३ एकर क्षेत्रावर राम रहीम याचा फार्महाऊस आहे. या फार्महाऊसमध्ये कोणीही अनुयायी नसून काही कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.