Devendra Fadanvis On Rahul Gandhi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशभरातील वातावरण तापू लागलंय. अशातच काँग्रेसच्या (Congress Rally) स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी काँग्रेसच नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना जोरदार हल्लाबोल केलाय. देशात सध्या विचारधारेची लढाई चालू असल्याचा पुनोच्चार राहुल गांधी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी राज घराण्यांवर देखील हल्लाबोल केला. त्यावर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले राहुल गांधी?


आमचं काही चुकलं तर कार्यकर्ते थेट आमच्याशी बोलतात. राजा-महाराजांच्या काळात जसा आदेश यायचा तसा आदेश भाजपमध्ये येतो. देशाच्या हितासाठी महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू जेलमध्ये गेले होते. भाजपने काय केलं ते सांगावं, असं राहुल गांधी म्हणाले होते. काँग्रेसमध्ये सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. देशाचे सूत्र हे हिदुस्तानातील जनतेच्या हातात असले पाहिजेत, अशी आमची विचारसरणी आहे. देशातील जनतेकडे, महिलांकडे कोणतेच अधिकार नाहीयेत. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी आहे. आम्ही तीच बदलली होती. पण भाजपला पुन्हा देशाला त्याच गुलामगिरीच्या काळात घेऊन जायचे आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?


"राहुल गांधी यांच्या भाषणाला उपस्थिती फार कमी होती. काही लोक त्यांच्या भाषणाआधी निघून गेली होती. त्यांची थीम होती, है तयार हम... मात्र, ते कशासाठी तयार आहेत? हे मला काही कळालं नाही. मात्र, लोकांना त्यांना ऐकायचं नाही. या देशामध्ये अनेक शूर राजे आणि राजघराणे होते. ज्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. आपलं स्वत: टिकून ठेवलं. राहुल गांधी म्हणाले, देशाच्या राजघराण्यांनी इंग्रजांसाठी साटंलोटं होतं. राजघराण्याचा अपमान करणं चुकीचं आहे. हे देशात सहन केलं जाणार नाही. भाषणाला माणसं कुठून आणली? तर, आम्हाला तर कळालंय की काही कर्नाटकमधून माणसं आणण्यात आली होती", असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला.


दरम्यान, एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या कर्मांकावर आलाच, पण कर्नाटक आणि गुजरात यांच्यापैक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली आहे. अनेकांना आरोप केले होते, मात्र या दोन्ही राज्यांपेक्षा आपल्याकडे जास्त गुंतवणूक झाली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.