अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान, `हिंमत असेल तर दडवून ठेवलेला 1400 पानांचा `तो` अहवाल समोर आणा
Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.
Anil Deshmukh challenge challenge Devendra Fadnavis: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझे यांनी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली. अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळून लावत सचि वाझेंच्या कुबड्या वापरुन फडणवीस माझ्यावर आरोप करत असल्याची टीका अनिल देशमुखांनी केली. ठाकरेंना अटक करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे समित कदमला पाठवल्याचा गौप्यस्फोट मी केल्यानंतर फडणवीसांनी अशी चाल खेळायला सुरुवात केल्याचे देशमुख म्हणाले. दरम्यान आज देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांना चॅलेंज दिले आहे. काय म्हणाले देशमुख? जाणून घेऊया.
3 वर्षापुर्वी परमविर सिंग आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांवर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्टपणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने माझ्याकडे पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील आरोपीच्या कुबडयांचा आधार घेऊन, केवळ राजकीय सुडबुध्दीने देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली असे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
6 वेळा समन्स पाठवूनही परमवीर आले नाहीत
पुढे बोलतांना अनिल देशमुख यांनी सांगितले की, न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने माजी पोलीस आयुक्त परमविर सिंग यांना सुध्दा कोर्टात बोलविले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवुन सुध्दा ते आले नाही. शेवटी त्यांचा पकड वॉरंट काढल्यावर त्यांनी वकीलाच्या मार्फत कोर्टात शपथपत्र लिहुन दिले की, मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते एैकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही.
'गुन्हेगार सचिन वाझेला हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस....', अनिल देशमुखांनी दिलं प्रत्युत्तर
1400 पानांचा अहवाल फडणवीसांनी दडवला
न्यायमुर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षापुर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षापासुन तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणीत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन न्यायमुर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनीक करण्यासाठी विनंती केली. दोन वर्षापुर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रामध्ये अनिल देशमुख यांना न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या अहवालात “क्लिन चिट” दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला “क्लिन चिट” दिल्यामुळे तो देवेंद्र फडणविस यांनी दडवून ठेवला आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून घ्यायचे पैसे, सचिन वाझेचे खळबळजनक आरोप
हिंमत असेल तर अहवाल समोर आणा
सचिन वाझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षापुर्वीचा आरोप करीत आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देतांना उच्च न्यायालयाने स्पष्ट पणे सांगीतले की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्हाच्या आरोपात असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात माझ्या वकीलांनी जेव्हा त्याची उलट चौकशी केली तेव्हा त्याने स्पष्ट सांगीतले की, 'अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएने किंवा कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागीतले नाही किंवा मी दिले नाही.' देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासनाला सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा असे आव्हानही अनिल देशमुख यांनी केले.