Nagpur Anil Deshmukh Answer: माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे वसुली करायचे, असा खळबळजनक आरोप सचिन वाझेने केला होता. यासंदर्भातील पुरावे आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार असल्याचे त्याने म्हटले होते. दरम्यान अनिल देशमुखांनी सचिन वाझेच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरदेखील टीका केलीय. मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. सचिन वाझेंने अनिल देशमुखांसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याची माहिती सचिन वाझेने दिली आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असे आरोप वाझेने केले आहेत
मी पाच-सहा दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला होता. फडणवीसांनी कशाप्रकारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना तुरुंगात टाकण्यासाठी षढयंत्र रचले होते, ते मी उघड केले होते. आता देवेंद्र फडणवीसांनी चाल खेळली आहे. सचिन वाझे आजही तुरुंगात आहे. त्याच्यावर 2 खुनांचा खटला सुरु आहे. सचिन वाझेच्या कोणत्याही विधानांवर विश्वास ठेवता येणार नाही, असं हायकोर्टने म्हटलंय. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझेला हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करतायत.
जे काही घडले, त्याचे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत गेले. याचे सीबीआयकडे पुरावे आहेत आणि मी एक लेखी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांना मी सर्व पुरावे सादर केले आहेत.सचिन वाझे हे 2021 च्या अँटिलिया बॉम्ब आणि मनसुख हिरेन खून प्रकरणातही आरोपी आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे अशी विधाने निवडणुकांवर नक्कीच परिणाम करणारे आहेत. अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या खंडणीचे आरोप याआधी झाले होते. यात आता सीबीआयकडे पुरावे असल्याचे सचिन वाझेंनी म्हटलंय. सचिन वाझे हे जामिनावर बाहेर आहेत. यात त्यांनी आता जयंत पाटलांचे नाव घेतले आहे. सचिन वाझे सांगत असलेले पुरावे काय आहेत? ते कधी आणि कशाप्रकारे बाहेर येणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अडचणी यामुळे वाढताना दिसताय.