अकोला: राज्यातील महाविकासआघाडी सरकारचे आणखी किती दिवस शिल्लक आहेत, याचे भाकीत देवेंद्र फडणवीसच सांगू शकतील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी सोमवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीच्या स्थैर्याविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राज्य सरकार किती वर्ष टिकेल, हे ज्योतिष देवेंद्र फडणवीस यांना विचारा. ते याबद्दल सांगू शकतील, असे आंबेडकर यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातोश्रीवर शिवसेना-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक; 'या' दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा


मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष निर्माण झाला आहे. याशिवाय, पारनेरमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याने उद्धव ठाकरे प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आज शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील तणाव निवळला आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


कोळी बांधवांवर अन्याय, बोगस सोसायट्यांना मच्छिमारी ठेके - प्रकाश आंबेडकर


सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक कोणीही बारा बलुतेदारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही, कोविडमुळे असलेल्या लॉक डाऊन मध्ये कुंभार व नाभिक समाजाच्या प्रश्नांसाठी वंचितला जोरदार लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली, आता मात्र मच्छीमारांचा प्रश्न बिकट झाला असून मच्छीमार, कोळी बांधव नसलेल्या बोगस सोसायट्यांना मच्छिमारी करण्याचे ठेके दिले जात आहे. त्यात सुधारणा करून वर्षानुवर्षे, परंपरागत मच्छीमारी करीत आलेले आहेत अशा मच्छिमार बांधवांना ठेका देण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

राज्यात असलेले तलाव, बंधारा किंवा नदीकाठचा भाग हा ठेके पद्धतीने मच्छिमार बांधवांना मच्छीमारीसाठी दिला जातो. मात्र गेल्या काही वर्षात मच्छिमारी व्यवसायाचा ज्याचा काडीमात्र संबंध नाही असे लोक बोगस सोसायट्या तयार करतात व प्रशासनाकडून मच्छीमारीचा ठेका घेतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मच्छिमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांवर अन्याय होत असतो. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा बोगस लोकांचा ठेका बंद करू खऱ्या कोळी बांधवांना मच्छिमारी करण्यासाठी ठेके देण्यात यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.दरम्यान, कोळी बांधवांच्या प्रश्नांचा प्रशासन गांभीर्याने विचार करेल, अशी अपेक्षा ही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.