Maharashtra Assembly Election: राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होताच सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच महायुतीच्या नेत्यांनी जाहीर सभाचा धडाका लावला आहे. अशातच महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण असणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीत ज्याच्या जास्त जागा हा फॉर्म्युला नाही. ज्याचा जास्त स्ट्राईक रेट असा फॉर्म्युला नाही. मुख्यमंत्रीपदाबाबत जे ठरलं आहे तो निर्णय परत करायचा. ज्यामध्ये फॉर्म्युला काय, कोणत्या रस्त्याने जाणार. पण आम्हाला जायचच नंतर आहे. जेव्हा जाण्याचा निर्णय येईल तेव्हा आम्ही ठरवू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


सरकार बदललं त्या दिवशी माझं दुःख संपलं


विधानसभा निवडणुकीसाठी आमच्याकडे कोणताही प्लॅन नाही. फक्त एकच प्लॅन आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभूत करून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करायचे. सरकार बदललं त्या दिवशी माझं दुःख संपलं. मुख्यमंत्री पदाची लालसा ही या करता उरलेली नाहीये. मी पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात काम केलं आहे. जो मुख्यमंत्री झालेला नसतो त्याला वाटतं असतं मुख्यमंत्री झालं पाहिजे. पण आता मी त्या मानसीकतेचा राहिलो नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री झालो नाही झालो असं काही नाही. 


पक्षाची अधिकृत भूमिका अमित शाहांनी मांडली


भाजपच्या नेत्यांचं एक ठरलेलं असतं. जर कोणीही भाजपच्या उमेदवारच्या प्रचाराला गेलं की, त्या उमेदवाराला जिंकवायचं आहे. भाजपाला निवडून द्या. आपल्या देवेंद्र फडणवीसांना जिंकवून द्या. असं म्हटलं जाते. कारण कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याबद्दल एक आपुलकी असते. त्यामुळे भाषणात असं म्हटल्याने कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह येतो. म्हणून अमित शाह किंवा इतर नेते असे भाषणात म्हणत असतात. 


भाजपची आणि महायुतीची अधिकृत भूमिका ही आम्ही पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे. तिच भूमिका शेवटपर्यंत राहणार आहे. निवडणुकीनंतर महायुतीच्या तीनही पक्षांनी एकत्र बसून ते निर्णय घेतील. जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य असेल.