Devendra Fadnavis On Uddhav Thackeray :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनी (shisvena anniversary) भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कल्याणमधील मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी असल्याचे  देवेंद्र फडणवीस म्हणाले (Maharashtra Politics). 


उद्धव ठाकरे यांची मोदींवर टीका 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेची मस्ती दाखवायची असेल तर अमेरिकेला जाण्यापेक्षा विश्वगुरूंनी मणिपूरला जाऊन दाखवावं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते. शिवसेनेच्या महाशिबिरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवरही टीकेची झोड उठवली होती.  पंतप्रधान हा देशापेक्षा मोठा नसतो. देशाची ओळख भारत, हिंदूस्थान आणि भारतीय अशी झाली पाहिजे. भारतीयांची ओळख मोदींचा अंध भक्त अशी होता कामा नये असे  उद्धव ठाकरे म्हणाले होते. 


मोदींवर टीका करणे म्हणेज सूर्यावर थुंकण्यासारखे


सुर्यावर थुंकल्यावर थुंकी आपल्याच अंगावर उडते. त्याच प्रमाणे मोदींवर टीका करणे म्हणेज सूर्यावर थुंकण्यासारखे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे ओकारी आहे अशा अत्यंत जहरी भाषेत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.  महाराष्ट्रात पहिले कुणी गद्दारी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. सत्तेसाठी ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघातही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.