Devendra Fadnavis : माझ्याशी विश्वासघात केला तर त्याचा सत्यानाश होतो असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अकलूजच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले. माझा इतिहास तपासा, ईश्वरच त्यांचा सत्यानाश करतो असं म्हणत  देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील, उत्तम जानकर यांच्यासह विरोधकांना इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयसिंह मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीसांनी उपकाराची जाणीव करुन दिली. मोहिते पाटलांचं राजकारण पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा दिल्याचं फडणवीस म्हणाले. महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या निर्णयावर, फडणवीसांनी सोलापुरात प्रतिक्रिया दिली. 


माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक पाहायला मिळालाय. काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटलांचा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलंय. धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत. त्यांच्या रुपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावला आहे. तसंच माढा निवडणुकीत मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष निर्माण करण्यातही त्यांना यश आलंय. 


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुठे होणार याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू, असं देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी सभा घेणार का याबाबत उत्सुकता होती. या पार्श्वभूमीवर, फडणवीसांनी ही माहिती दिली. 


देशात दारूबंदी करण्यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचं वक्तव्य लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलय. तसेच लाल किल्ल्यावरून स्वच्छ भारताची घोषणा करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान असल्याचा दावाही त्यांनी केला. बार्शीतील प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 


2017 सालीच भाजपसोबत जाण्याचं ठरलं होतं. अजित पवारांचा दौंडच्या सभेमध्ये गौप्यस्फोट केला. एका उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस, शरद पवार आणि आमच्या बैठका व्हायच्या. काँग्रेससोबतही बोलणी सुरू होती. खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथ विधी झाला. अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच सांगितलं.