फडणवीस, शिंदे, उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर? राज्यात सर्वात मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता
आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यात सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे.
Maharashtra Politics: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती (Balasaheb Thackeray Birth Anniversary) आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात आहे. शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळारही शिवसैनिक गर्दी करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्विट करत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यातच आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यात सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यात सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच मंचावर दिसण्याची शक्यता आहे.
...तसं झाल्यास उद्धव, राज आणि शिंदे एकत्र दिसणार
विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या कार्यक्रमासाठी ठाकरे कुटुंबातील सगळ्यांनाच निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र निमंत्रण मिळाल्यानंतरही ठाकरे कुटुंब कार्यक्रमाला येणार का? याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं Eus. उद्धव, राज ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित आल्यास एकाच मंचावर फडणवीस, शिंदे, उद्धव, राज ठाकरे दिसतील.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त मोदींसह शिंदे, मनसेकडून ट्वीट
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केलं आहे. ट्वीटमधून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना मुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी मानवंदना दिली आहे. ट्वीट करत पंतप्रधान मोदींनी बाळासाहेबांचं स्मरण केलं आहे.
मनसेने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केला असून शेवटच्या दिवसांमध्ये झालेल्या संभाषणाची आठवण करुन दिली आहे.
त्यातच आज उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुखपदी कायम राहणार का यासंबंधी निर्णय किंवा महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.