विधानसभा निवडणुकीत महायुतीचा ऐतिहासिक विजयानंतरही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार अद्याप स्पष्ट झालेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर गुरुवारी (28 नोव्हेंबर) ला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत महायुतीचे भाजपचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा तर झालीच शिवाय या तिन्ही पक्षाने (Maharashtra Government) आपल्याला कोणते खाते (Maharashtra New Cabinet Minister List) हवेत याबद्दल आपली स्पष्ट भूमिका मांडली. (devendra fadnavis eknath shinde Ajit Pawar has demanded these ministerial posts at amit shah meeting delhi)


'ही' खाती भाजप स्वत:कडे ठेवणार!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एक पुढे आला आहे. महायुतीत भाजप मोठा भाऊ असल्याचे पाहिला मिळलं. त्यामुळे अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचा खात्यांवर आपल्याच अधिकार असल्याच म्हटलंय. (Maharashtra New Cabinet Ministers and Portfolio Distribution) भाजपला गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


एकनाथ शिंदेंनी काय केली मागणी?


तर या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मनातलं सगळं अमित शाह यांच्यापुढे बोलून दाखवलं असं बोलं जातंय. त्याच वेळी त्यांनी 12 मंत्रिपदांची मागणी शाहांकडे केलीय. शिवसेनाला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पाणी पुरवठा, आरोग्य, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती हवी आहेत, असं सांगण्यात येतं. तर भाजप ही खाती एकनाथ शिंदेंसाठी सोडण्यास तयार असल्याच म्हटलं जातंय. 


अजित पवारांना कुठली खाती हवी?


नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री पदाची मागणी करण्यात आलीय.  अर्थ, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्यांक, आदिवासी विकास आणि इतर महत्त्वाच्या खात्यांची मागणी अजित पवार यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिलीय. तर भाजप हे खाती सोडण्यासाठी तयार असल्याचही समजतं. दरम्यान आज मुंबईत खाते वाटप संदर्भात चर्चा होणार आहे, अशी माहिती मिळतेय.