महाराष्ट्रातून दिल्लीत कोण जाणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासला एक्सक्लूझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी ऑपरेशन लोटस पासून ते निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत आणि राज्यातून दिल्लीला कोण जाणार? या मुद्द्यांवर उत्तरं दिली.
राज्यातील भाजप मजबुत, रिकामटेकडे लोक फोडाफोडीच्या चर्चा करतायत- फडणवीस
'महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवण्यासाठी आम्ही काही नावं दिली आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे चेहरे दिल्लीला येतील, क्यात ग्रामीण भागातून चेहरे दिले आहेत. काही महिलांनाही संधी देण्यात आली आहे,' असं फडणवीस म्हणाले.
निसर्ग चक्रीवादळ: राज्य सरकारने केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवलाच नाही- फडणवीस
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातील ४ नेत्यांचा समावेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राज्यातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार आणि संभाजी निलंगेकर पाटील यांची निवड होण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यामध्ये या कार्यकारिणीची घोषणा होऊ शकते.