Juhi Chawla on  Mumbai : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा जुही चावला ही मुंबईतील हवेवरून केलेल्या टीकेने ती चर्चेत आली आहे. दक्षिण मुंबईतील काही भागातील प्रदुषित हवेबाबत भाष्य केलं आहे. याबाबत जुही चावलाने ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणाच्या हे लक्षात आले आहे का की, मुंबईतील हवेत एक प्रकारची दुर्गंधी आहे. पूर्वी हा वास खाडीजवळून (वरळी आणि वांद्रा, मिठी नदीजवळ नेहमी अस्वच्छ प्रदूषित असणारे जलकुंभ) गाडी चालवताना हा वास येत होता. आता ही दुर्गंधी संपूर्ण दक्षिण मुंबईत पसरली असल्याचं जुही चावलाने म्हटलं आहे. जुही चावला इतकंच बोलून थांबली नाहीतर त्यानंतर, रात्रंदिवस एका गटारामध्ये आपण राहत आहोत असं वाटत असल्याचंही जुही चावलाने म्हटलं आहे.  


जुही चावलाच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिला सुनावलं आहे. मुंबई हे उत्तम शहर आहे. एक खरं आहे की इन्फ्रा स्ट्रक्चरच्या काही कमतरता आहेत. महापालिकेच्या भ्रष्टाचारामुळे मुंबईमध्ये काही अडचणी लोकांना सहन कराव्या लागत आहेत. आता आमचं सरकार आलं आहे आता मुंबई बदलणार आहे त्यामुळे मुंबईला सरसकट बोलणं हे अतिशय चुकीचं ठरेल. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे त्यामुळे सेलिब्रेटींनी अशा प्रकारचं वक्तव्य करताना विचारपुर्वक बोललं पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जुहीला टोला लगावला आहे. 


 



दरम्यान, जुहीने केलेल्या ट्विटवरून तिला लोकांनीही चांगलंच ट्रोल केलं आहे. लेक्चर देण्यापेक्षा झाडं लावायला सुरूवात कर, इथं त्रास होत असेल तर दुसऱ्या शहरात जाऊन रहा, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला फैलावर घेतलं आहे.