नागपूर : पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश देण्यात आले. पण ते मागे घेण्यात आले. यामागे वसुलीचा भाग आहे का? अशी शंका विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस ( Devendra fadnvis ) यांनी व्यक्त केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यात इंग्रजांचे राज्य होते. तसे पोलीस राज सुरु आहे. कुणाचे तरी लांगुलचालन सुरु आहे. दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत. पण यात विशेषतः हिंदू समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये तणाव वाढत आहे. पोलिसांनी जात धर्म न पाळता कारवाई केली पाहजे असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.


भाजपची पोलखोल यात्रा सुरु आहे. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते आरोपांमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे रथावर हल्ले होत आहेत. पण, कितीही हल्ले केले तरी ही पोलखोल यात्रा थांबणार नाही. पोलीस ज्या कुणाला संरक्षण देत आहेत ते त्यांनी थांबवावे अन्यथा पोलिसांचीही पोलखोल कऱण्यात येईल असा इशारा फडणवीस यांनी दिला.