Maharashtra Politics : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे (nashik padvidhar election) सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी अचानक माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला. तर सुधीर तांबे यांच्या माघारीनंतर त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (satyajeet tambe) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर काँग्रेसकडून सत्यजित तांबे आणि सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी दिली होती. यानंतर बोलताना सत्यजित तांबे यांनी आपण भाजपसह (BJP) सर्वच पक्षांकडून पाठिंबा मागणार असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमानंतर माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत भाष्य केले आहे. अशातच भाजपकडून पाठिंबा मागणाऱ्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.


"योग्यवेळी यासंदर्भात खुलासा करु. बघत राहा. परिस्थितीवर लक्ष ठेवा योग्यवेळी योग्य गोष्टी आपल्याला समजतील," अशी सूचक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


दुसरीकडे सत्यजित तांबे एक व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून निश्चितपणे त्यांचं काम चांगलं आहे. पण शेवटी सगळे राजकीय निर्णय धोरणांप्रमाणे योग्यवेळी करावे लागतात, अशी प्रतिक्रिया याआधी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.


बाळासाहेब थोरात यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही


सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. "नाशिकमध्ये काहीतरी वेगळं शिजतंय याची बातमी आपल्याला आधीच मिळाली होती. त्याबाबत मी थोरातांना अलर्ट केलं होतं. पण माझ्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. वेगळा पर्याय होईल हे कानावर आलं होतं. त्याचवेळी मी थोरातांना अलर्ट केलं होतं. पण आमच्या पक्षाची जबाबदारी आहे. आम्ही व्यवस्थित पार पाडू," असंही थोरात म्हणाले असे अजित पवार म्हणाले.