The Kerala Story : `सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज,` फडणवीसांचे जितेंद्र आव्हाडांना सणसणीत उत्तर
The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून `द केरळ स्टोरी` सतत चर्चेत आहे. नुकताच द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा वाद काही थांबताना दिसत नाही.
Devendra Fadnavis : 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटावरुन राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात चित्रपट करमुक्त करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या चित्रपटासंदर्भात वादग्रस्त विधाने केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी द केरळ स्टोरी हा चित्रपट पाहिल्यानंतर विरोधकांना सणसणीत उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awad) यांनी या चित्रपटाबाबत वादग्रस्त विधान केले असून, “खोटारडेपणालाही एक मर्यादा असेत. एका धर्माला आणि राज्याला बदनाम केले जात आहे. या चित्रपटाच्या निर्मात्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे. हा चित्रपट महिलांना बदनाम करण्याचे काम करत आहे." अशी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) हा चित्रपट पाहिल्यानंतर या चित्रपटाचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे, द केरळ स्टोरी या चित्रपटाच्या माध्यमातून एक विदारक सत्य जनतेपुढे आले आहे. खरे तर हा केवळ एक सिनेमा नसून जनजागृतीचे माध्यम आहे, अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. याचदरम्यान देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी (9 मे 2023) नागपुरात रात्री चित्रपट पाहिल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. ते म्हणाले की, सिनेमाच्या माध्यमातून एक विदारक सत्य या सिनेमाने मांडले आहे. कशाप्रकारे देश पोखरला जातोय, आमच्या भागिनींसोबत षडयंत्र होतेय, हे सर्वांसमोर आले पाहिजे. हा चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे डोळे उघडतील.
याचदरम्यान या चित्रपट निर्मात्याला भर चौघांत फाशी दिली पाहिजे, या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाबाबत माध्यमांनी फडणवीसांना विचारले असता, आव्हाड असे बोलले असतील तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी असे बोलून हिंदू समाजात रोष निर्माण होतो. सडक्या मेंदूत येणाऱ्या सडक्या विचारांना फाशी देण्याची गरज, हे वक्तव्य तपासून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बंदी आणि विरोध असतानाही प्रतिसाद
मुस्लीम तरुण हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकतात, त्यांचे धर्मांतर करतात आणि त्यांना अफगाणिस्तान, इराण, सीरिया किंवा इतर देशांमध्ये घेऊन जातात, अशी स्टोरी या चित्रपटात देण्यात आली आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाला बंदी आणि विरोध असूनही प्रेक्षकांकडून प्रचंद प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाच्या कमाईत 30% अधिक वाढ झालेली दिसली. तर 'द केरळ स्टोरी'ने पहिल्या आठवड्यात 35.25 कोटींची कमाई केली आहे.