नागपूर, झी मीडिया, अमर काणे :  नागपूर( Nagpur) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डीहून(Shirdi) साईबाबाचे(Saibaba) दर्शन घेऊन घरी येत असताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात(accident) झाला आहे. हे भक्त शिर्डी आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरालगत खापरी येथे हा अपघात झाला. टाटा विंगर कारने उभ्या ट्रकला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात दोन ठार ,तर आठ जण जखमी झालेत. यामध्ये दोन महिला गंभीर जखमी आहेत. तर दोन महिला व चार लहान मुलेही जखमी आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सासरा आणि जावई असे नाते आहे. शिर्डी आणि पंढरपूर येथून देवदर्शन करून परत येत असताना बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढला. 


नागपुर येथील हजारी पहाड भागात राहाणारे रणजित शेंडे , त्यांची पत्नी रंजना शेंडे, जावई प्रभात बावनकर व विवाहित मुलगी स्वाती बावनकर हे सहकुटुंब शिर्डी व पंढरपूर येथे त्यांच्या टाटा विंगर कारने देवदर्शनासाठी गेले होते. 
देवदर्शनाहून परत येत असताना खापरी जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पीबी 13, बीएच 6767 क्रमाकांच्या उभ्या ट्रकला त्यांची कार धडकली.


ट्रक चालकाने पार्किंग लाईट लावली नव्हती. तसेच रिफ्लेक्टर न लावता निष्काळजीपणे ट्रक रस्त्याच्या बाजूला पार्क केला होता. या अपघातात सासरे रणजित शेंडे व जावई प्रभात बावनकर हे ठार झाले. तर बावनकर यांची पत्नी स्वाती गंभीर जखमी झाली. तिला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.