कैलास पुरी, आळंदी : ग्यानबा तुकोबाचा गजर आणि विठू नामाच्या जयघोषाने देवाची आळंदी दुमदुमली. कार्तिकी एकादशीसाठी दाखल झालेल्या लाखो भाविकांनी आज आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजाच्या समाधीच दर्शन घेतलं. दुष्काळाचे संकट दूर व्हावं हे साकडं भाविकांनी घातले. कार्तिक वारीच्या निमित्ताने आळंदी अर्थात अलंकापुरी हजारो भाविकांनी गजबजून गेली. हरिनामाचा जयघोष आणि भजन कीर्तन यांनी भक्तिपूर्ण झालेलं वातावरण यामूळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो भागवतांनी आळंदीत दाखल होत या सोहळ्याचे साक्षीदार होण्याच भाग्य मिळवलं. परंपरे नुसारआळंदीत समाधी महापूजा पार पडली....समाधीला अभिषेक घालण्यात आला. या अनुपम सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकर्यांनी समाधान व्यक्त केल. पण त्याच वेळी राज्यावरचे दुष्काळाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले...! 


माऊली आणि विठुरायाच्या गजरात अवघी अलंकापुरी निनादून निघाली आहे. आता वैष्णवांना वेध लागलेत ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे. चार डिसेंबरला हा सोहळा पार पडणार आहे.