मुंबई : लेखक अरविंद जगताप  (Arvind Jagtap) यांनी चला-हवा-येऊ- द्या (Chala Hawa Yeu Dya) मध्ये ऊसतोड कामगार, त्यांची मुलं आणि त्यांचे भविष्य या संदर्भात लिहिलेले पत्र सन्माननीय पंकजा मुंडे ,रोहित पवार आणि सुजय विखे पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत सागर कारंडे यांनी वाचले आणि ते महाराष्ट्रात खूप गाजलं आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे एक पत्र अरविंद जगताप यांना आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्रात धनंजय मुंडे असं लिहितात की, ऊसतोड कामगारांच्या संदर्भातील पत्र वाचून त्यांच्या अंगावर काटा आला. त्यांचे वडीलही ऊसतोड कामगार होते. काबाडकष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांना त्यांच्या लेकरांच्या नशिबी हीच पाचाट आणि कोयता द्यावा लागतो.


त्यांचं हेच भविष्य सुधारण्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभारलेल्या महामंडळ आता धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्यात मागून घेतल आहे. राबणाऱ्या आपल्या या आया, बहिणी साठी त्यांना एक विशेष सहाय्य योजना आखायची आहे.या कामगारांना हक्काचं काम मिळावं म्हणून रोजगार हमी योजनेसारखी काम हाती घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.



या सर्व कामगारांच्या सुरक्षा आणि लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मी शब्दबद्ध आहे असं अभिवचन धनंजय मुंडे यांनी या पत्राद्वारे दिल आहे. या पत्राच्या अखेरीस ऊसतोड कामगारांसाठी त्यांनी घेतलेल्या या प्रयत्नांची दखल अरविंद जगताप यांनी घेऊन या संदर्भात एक पत्र भविष्यात लिहावं अशी आशा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.