मुंबई : भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उद्योगाची भरभराट झाली असून आता पतंजलिची उत्पादन महाराष्ट्र सरकारचं विकणार आहे. सरकार रामदेव बाबावर करत असलेल्या या मेहरबानीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी चांगलीच टीका केलीये.


काय म्हणाले मुंडे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पतंजली या स्वतःच्या मर्जीतील खाजगी कंपनीला आपल्या सरकारची केंद्र विक्रीसाठी देण्यापेक्षा या राज्यातील हजारो महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने, या केंद्रातून विकली तर राज्यातील लाखो गरीब महीलांना रोजगार मिळाला असता".


"आपले सरकार मार्फत #पतंजली ची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजली वर मेहेरनजर दाखवत आहे. एकाच खाजगी कंपनीचे सरकारला इतके प्रेम का? आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानंच करायचे असेल स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय कंपन्यांचीही उत्पादने विक्रीला ठेवा".


सरकार पतंजलीवर मेहरबान


महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार सेवा केंद्राच्या डिजिटल सेवेमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना विक्रीसाठी ठेवण्याबाबत स्पष्ट जीआरच काढण्यात आला आहे. एखाद्या खाजगी कंपनीची उत्पादने अशा पद्धतीने सरकारमार्फत विकण्याची ही पहिलीच वेळ असून सरकार पतंजलीवर एवढे मेहरबान का असा सवाल उपस्थित केला जातोय.