`बडे मियाँ-छोटे मियाँच्या भुल-थापांना बळी पडू नका`
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची १४वी सभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये झाली.
परभणी : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेची १४वी सभा परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये झाली. यावेळी वाढती महागाई, महिला सुरक्षा, धनगर आरक्षण, शेतक-यांचे प्रश्न आणि कर्जमाफी अशा मुद्द्यांवरून राष्ट्रवादीने सत्ताधा-यांवर घणाघाती टीका केली.
खोट्या जाहिरात देऊन या बडे मियाँ- छोटे मियाँच्या भूल-थापांना बळी पडू नका, असं आवाहन हल्लाबोल यात्रेदरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंडय मुंडेंनी केलं.
दरम्यान ज्यांनी आतापर्यंत या महाराष्ट्राला लुटलं, शेतकऱ्यांना नागवलं त्यांनी हल्लाबोल यात्रा काढणे म्हणजे केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. मराठवाड्यातील जनतेचा अनुशेष सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रात पळवून नेला होता त्यावर ते का बोलत नाही, असा सवालही संभाजी पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.