मुंबई : ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते आणि कॅबिनेट मिनिस्टर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या बहिणीसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या ट्विटवर धनंजय मुंडेंनी सांत्वन केलं आहे. पंकजा मुंडेंना सर्दी असून ताप आहे त्यामुळे त्यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की,'पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदी चे मत देऊन विजयी करावे .. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी..'. या ट्विटला रिट्विट करत धनंजय मुंडेंनी ट्विट केलंय. 



धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की,'पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.'



जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली. करोना आजारात होणारा त्रास मुंडे यांनी अनुभवला आहे. त्यातूनच त्यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे