मुंबई : धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हा अखेरचा लढा आहे. दरम्यान, मुंबईकडे धनगर समाजाने कूच देत असताना सायन - पनवेल मार्गावर कळंबोळी येथे केला रास्तारोको केला. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, रायगड पोलिसांनी धनगर समाजाच्या नेत्यांना गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांना ताब्यात घेतले होते. त्यांना सोडावे यासाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्‍याने होत आहे. त्‍यासाठी मोर्चे आंदोलने करूनही सरकार योग्‍य प्रतिसाद देत नसल्‍याने धनगर समाजाने अखेरचा लढा 'धनगर आरक्षण' हे ब्रीद घेवून महाड ते मंत्रालय अशी पदयात्रा आजपासून सुरू केली आहे. आरक्षणसाठी धनगर समाजाने एल्‍गार केला आहे. महाडच्‍या चवदार तळयावरून पदयात्रा निघाली आहे. १ मार्च रोजी मंत्रालयावर धडक देण्याचा निर्धार केला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, अनुसूचित जमातीचा दाखला मिळावी, अशी मागणी सातत्‍याने होत आहे. त्‍यासाठी मोर्चे आंदोलने करूनही सरकार योग्‍य प्रतिसाद देत नसल्‍याने धनगर समाजाने अखेरचा लढा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडच्‍या चवदार तळयावर डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि चवदार तळयाचं पाणी कलशात घेवून ही पदयात्रा सुरू झाली आहे. धनगर बांधव आपल्‍या मुलाबाळांसह, मेंढरं आणिर जनावरे घेवून या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. मुंबईला ही पदयात्रा पोहोचेपर्यंत राज्‍यभरातील लाखो धनगर बांधव यात सहभागी होतील  हे सरकार स्‍थापन झाले तेव्‍हाच आम्‍हाला आरक्षणाचे आश्‍वासन देण्‍यात आले. जोपर्यंत सरकार आरक्षण देत नाही तोपर्यत आम्‍ही स्‍वस्‍थ बसणार नाही आणि सरकारने दिले नाही तर त्‍यांना सत्‍तेवरून खाली खेचू असा इशारा यावेळी देण्‍यात आला. यावेळी खासदार विकास महात्‍मे आमदार प्रकाश शेंडगे, उत्‍तम जानकर, गोपीचंद पडळकर हजर होते त्‍यांना आज सकाळी चवदार तळयावर येण्‍यास मज्‍जाव करण्‍यात आला होता. परंतु नंतर परवानगी देण्‍यात आली.


दरम्‍यान आज संध्‍याकाळी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत यासदंर्भात बैठक बोलावली असून त्‍या बैठकीत निर्णय होईल अशी अपेक्षा आंदोलकांनी व्‍यक्‍त केली आहे.