ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : एका महिलेने आपल्या तीन लेकरांसह तलावात उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये (Dharashiv) उघडकीस आली आहे. यात सात महिन्यांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. कांचन बबन बनसोडे असं महिलेचं नाव असून धाराशिवमधल्या कोंड गावात ती आपल्या पतीसह राहात होती. पतीच्या व्यसनधीनतेला (Addiction) कंटाळून कांचन बनसोडेने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. गावातील अवैध दारू विक्रेत्यावर (Illegal Iiquor Seller) कारवाई केल्याशिवाय मृतदहे ताब्यात घेण्यास गावकऱ्यांनी नकार दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांचनचा पती बबन बनसोडे याची काही महिन्यांपूर्वी नोकरी गेली होती. त्यानंतर त्याला दारूचं व्यवसन जडलं. रोज दारू पिऊन घरी येत असल्याने तसंच आर्थिक परिस्थिती बिघडल्याने पती-पत्नीमध्ये भांडणं होत होती. मुलांच्या जेवणाचीही आभाळ होत असल्याने कांचन त्रस्त झाल्या होत्या. अनेकवेळा सांगूनही पती बबन ना दारू सोडण्यास तयार होता ना नोकरी करण्यास. अखेर पतीच्या व्यसनाला कंटाळून कांचन बनसोडेने तीन लेकरांसह तलावात उडी घेऊन जीवण संपवलं. 


धाराशिव तालुक्यातील कोंड गावात ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठरावही घेतला होता. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. गावात राजरोजपणे अवैद्य दारू विक्री सुरू होती त्यामुळेच ही घटना घडली असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे


वऱ्हाड्याच्या कारला अपघात
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाड्याच्या कारला अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. लग्नसोहळा आटोपून सर्वजण कारने घरी परतत होते. पण देव्हाडा पेपर मिलजवळ कारला भीषण अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.