Dharashiv Crime: पाण्याच्या वादातून भावकीचे भांडण, एकाच घरातील तिघांचा मृत्यू
Dharashiv Crime: शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून वादाला तोंड फुटलं.
Dharashiv Crime: माणसाला स्वत:च्या क्रोधावर नियंत्रण ठेवता आलं नाही तर अघटीत घडायला वेळ लागत नाही. क्रोधाच्या भरात माणूस माणसाचा जीव गेला तरी मागेपुढे पाहत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाण्याच्या वादातून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी येथे घडली. रात्रीच्या वेळी शेतीच्या पाण्यावरुन वादाला सुरुवात झाली. भावकीचे भांडण सुरु झाले. यामध्ये बाप, लेक आणि पुतण्याला आपला जीव गमवावा लागला. काय आहे ही नेमकी घटना? सविस्तर जाणून घेऊया.
शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोणाची यावरून वादाला तोंड फुटलं. पुढे वाद विकोपाला गेला आणि विहिरीवरच जीवघेण्या हाणामारीला सुरुवात झाली. यात तिघांना आपला जीव गमवावा लागला.
आप्पा काळे आणि परमेश्वर काळे मृत बापलेकांची नावे, तर पुतण्या सुनील काळे याचा देखील मृत्यू झाला.
शेतातील पाण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात घडली. दोन गटात झालेल्या भांडणात बापलेकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या गटात असलेला त्यांचा पुतण्याचाही मृत्यू झाला. दोघांमध्ये असलेली विहिरीची मालकी कोणाची यावरू वादाला तोंड फुटले. यात ही दुर्दैवी घटना घडली.