धाराशिवच्या प्रेम शिंदेची आत्महत्या की हत्या? दीड हजार वाखरवाडी ग्रामस्थांनी केली `ही` मागणी
Prem Shinde Suspicious Death: प्रेम शिंदेच्या शरिरावर मारहाणीचे काळे निळे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हत्या की आत्महत्या? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
Prem Shinde Suspicious Death: धाराशिवमध्ये अध्यात्मिकतेचे शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय प्रेम शिंदे या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले होते. यामुळे धाराशिव तालुक्यातील खळबळ माजली होती. ही आत्महत्या नसून शिक्षकांनी केलेल्या मारहाणीला कंटाळून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे प्रेम शिंदेच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असून गावकरी संतप्त झाले आहेत. तब्बल दीड हजार लोकसंख्या असलेल्या गावाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
प्रेम शिंदे या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संस्था चालकासह इतर ३ व्यक्तींविरोधात ढोकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाणेवाडी येथील श्री संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मीक संस्थेत तो संप्रदायीक शिक्षण घेत होता. येथे शिकवणाऱ्या महाराजांच्या सततच्या मारहाणीला कंटाळून त्याने गळफास घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीय पेट्रोकेमिकल्स संस्थेत बंपर भरती, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज
प्रेम शिंदेच्या शरिरावर मारहाणीचे काळे निळे व्रण आढळले आहेत. त्यामुळे हत्या की आत्महत्या? असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्युची सीआयडी मार्फत चौकशी करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी वाखरवाडी गावात ग्रामस्थांचे चूल बंद आंदोलन होणार आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या वाखरवाडीत आज आमरण उपोषण केले जाणार असल्याची बातमी समोर येत आहे.
'माझा मुलगा प्रेम हा महीन्याभरापूर्वी कोणाला काही न सांगता घरी वाखरवाडी येथे सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आला होता. त्यावेळी कोणालाही काही न सांगता का आलास असे विचारल्याचे त्याच्या वडिलांनी पोलीस तक्रारीत म्हटले. त्यावेळी, 'मला नांदे महाराजांनी शेतात काम न केल्यामुळे खूप मारले आहे असे त्याने सांगितले. काका महाराज उंबरे हे आश्रमाच्या शेतात खूप काम करायला लावतात आणि इतर महाराजही काम नाही केले तर मारहाण करतात आणि रागावतात',असे प्रेमने सांगितले होते. मला त्यांची भrती वाटत असल्याचेही तो म्हणाला होता, असे वडिलांनी सांगितले.
आयकर विभागात पदवीधरांना नोकरीची संधी, 40 हजारपर्यंत मिळेल पगार
यानंतर प्रेमला त्याच्या वडिलांनी त्याच दिवशी वानेवाडी येथील आश्रमामध्ये सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास नेऊन सोडले होते. मुलाला मारहाण का केली? असे महाराजांना त्यांनी विचारले.तेव्हा, तो आश्रमामधून पळून जायचे म्हणत होता म्हणून मारहाण केली होती असे उत्तर त्यांनी दिले. त्याला परत मारहाण करू नका आणि विश्वासात घेऊन शिकवा असे बोलून त्याचे बाबा परत गावी परतले होते.