Big Update : धारावी नवीन नावाने ओळखली जाणार; अदानी ग्रुपने पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलले
Dharavi Navbharat Mega Developers : धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. अदानी ग्रुपने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलले आहे.
Dharavi Redevelopment Project Rename as Navbharat Mega Developers : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा नारळ फुटला. ठिकठीकाणी धारावी प्रकल्पाचा श्रीगणेशा असे बॅनरही लागलेत. त्यामुळे अनेक पिढ्यांपासून पुर्नविकासाची वाट पहाणा-या धारावीकरांसाठी नवा बदल नजरेच्या टप्प्यात आला आहे. अदानी ग्रुप धारावी पुनर्विकास करणार आहे. पुर्नविकासाआधीच धारावी नवीन नावाने ओळखली जाणार आहे. अदानी ग्रुपने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे नाव बदलले आहे.
हे देखील वाचा... भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे विमानतळ आपल्या महाराष्ट्रात; एकावेळी उभी राहतील 350 विमाने
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड (डीआरपीपीएल) मार्फत धारावीचा पुर्नविकास केला जात आहे. मात्र, आता धारावी पुनर्विकास प्रकल्पा नव्या नावाने ओळखला जाणार आहे. धारावी पुनर्विकास करणाऱ्या अदानी ग्रुपने या प्रकल्पाला नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (NMDPL) असे नवे नाव दिले आहे. या बदलाला कंपनीच्या संचालक मंडळ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे.
मुंबईच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी असलेली एक महत्वाची ओळख. मुंबईतील लघुउद्योगांचं केंद्र असलेली धारावी. अत्यंत अस्वच्छतेचं, रोगराईचं केंद्र समजली जाणारीही धारावीच. मुंबईच्या बीकेसी, सायन, माहिम, वांद्रे या उच्चभ्रू भागांनी वेढलेली जवळपास 600 एकरावर वसलेली आशिया खंडातील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात DRPPL मध्ये अदानी समूहाचा 80 टक्के हिस्सा होता. उर्वरित हिस्सा महाराष्ट्र सरकारकडे होता. या प्रोजेक्टचे रीब्रँडिंग केल्यानंतर कंपनीच्या शेअरहोल्डिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही. कंपनीच्या नावात बदल केल्याने धारावी प्रकल्पाबाबत सरकारची भूमिका किंवा प्रकल्पाच्या मूळ उद्देशात बदल होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व घटकांना प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीने रिब्रँडिंग केले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील बांधितांना 350 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिका मिळणार आहेत.