DHFL घोटाळा : वाधवान कुटुंबीय पाचगणीत क्वारंटाइन
लॉकडाऊनचे नियम धाब्यावर
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असताना DHFL घोटाळ्यातील आरोपींना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात आली. या प्रकरणाने सरकारचे लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवल्याचं कळतंय. वाधवान कुटुंबियांना आता महाबळेश्वरच्या सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
वाधवान कुटुंबियांना विशेष प्रधानसचिवांच्या पत्राने हा प्रवास केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. महाबळेश्वरला पोहोचल्यावर तेथील गावकऱ्यांनी ही धक्कादायक माहिती उघड केली. या प्रकरणाची रितसर तक्रार करण्यात आली. यानंतर या वाधवान बंधूंना त्यांच्या कुटुंबियांसह पाचगणीतील सेंट झेविअर्स शाळेत क्वारंटाइन केलं आहे. (येस बँक घोटाळा : लॉकडाऊनमध्येही आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला)
जिथे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा वाढतोय तिथे असे व्हीआयपी प्रवास करून लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदी करण्यात आली आहे. अशावेळी पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव केला जात असताना वाधवान कुटुंबियांचा हा प्रवास अतिशय धक्कादायक आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी २३ जणांनी एकत्र प्रवास केला आहे. सामान्यांना घराबाहेर पडण्यास रोखलं जात असताना DHFL घोटाळ्यातील आरोपींनाच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले असून गृहमंत्री अनिल देशमुखांनी चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रवासासाठी ज्या विशेष प्रधानसचिवांचे पत्र मिळाले त्या अमिताभ गुप्तांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.