कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन
कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.
धुळे : कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन सुरू केले आहे.
राहूरी कृषी विद्यापीठाच्या विभाजनानंतर नव्याने उभारण्यात येणारे कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावे, या मागणीसाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समिती घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनाला कृषी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
यासाठी केलं जातंय आंदोलन
कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करुन या प्रलंबित प्रश्नाकडे याच अधिवेशनात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा कृषी अधिक्षक प्रकाश सांगळे यांनीही आंदोलनात सहभागी होवून घंटानाद करुन या मागणीला पाठींबा दर्शविला.