धुळे : धुळे आणि अहमदनगर महापालिकेचा आज निकाल लागणार आहे.  सकाळी दहाला मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 43 टेबल, 16 फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया संपन्न होणार आहे. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये सर्व निकाल जाहीर होतील मात्र पूर्ण प्रक्रिया पार पाडायला चार तासांपर्यंत वेळ लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून सर्व योग्य ते उपाय योजले गेले आहेत.


कोणाची सत्ता ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदानाचा कौल नेमका कुणाला मिळतो ? आणि कोण महापालिकेत सत्ता गाजवत ?, हे दुपारी बारा वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला कोण 'पॉवरफुल' आणि कोण कोणाची 'पॉवर गुल' हे कळणार आहे. तर इकडे अहमदनगरमध्ये रविवारी सुमारे ६७ टक्के मतदान झालं. १७ प्रभागातील ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत.


सत्तेची समीकरण 


 भवानी नगर येथील शासकीय गोदामामध्ये सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होईल.


यापूर्वीचा सत्तेचा इतिहास पाहता तिन्ही निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला एकहाती सत्ता मिळाली नाही.


नगरसेवक फोडाफोडी आणि घोडेबाजारातून सत्तेची समीकरणं जुळवण्यात आलीत.


यंदा भाजपानं जोरदार प्रचार यंत्रणा राबवून स्वबळावर सर्व जागा लढवल्या आहेत.