प्रशांत परदेशी, झी 24 तास धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर जवळ एक बर्निंग ट्रक चा थरार पाहायला मिळाला. ही धक्कादायक घटना धुळ्याच्या पळासनेरजवळ केमिकलचा टँकर आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेनंतर टँकरनं पेट घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टँकरमध्ये केमिकल असल्याने झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. एका मोठ्या स्फोटानंतर टँकरमधील रसायनामुळे लहान स्फोट होतच राहिले. अवघ्या काही मिनिटांत टँकर जळून खाक झाला. यामध्ये टँकरचा चालक आणि क्लिनरचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



अपघातामुळे महामार्गाची वाहतूक विस्कळीत झालीये. रसायनाचा टँकर असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी त्याच्या जवळ जाणंही शक्य होत नाही आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद राहण्याची शक्यता आहे. टँकरमध्ये केमिकलयुक्त पदार्थ असल्या कारणाने टँकरचा स्फोट झाला या स्फोटाचा मोठमोठ्याने आवाज आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.


या आगीने रौद्ररूप धारण केलं असून संपूर्ण टँकर जळून खाक झालं आहे. गेल्या एक तासापासून आग सुरूच आहे. घटनास्थळी नागरिकांसह पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.