धुळे : धुळ्यातला कुख्यात गुंड रफियोद्दीश शेख उर्फ गुड्ड्याचा निर्घुण खून करणाऱ्या मारेकऱ्यांना चार दिवस उलटूनही पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींची माहिती देणा-यास दहा हजार ते 50 हजारांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी जाहीर केले आहे. माहिती सांगणार्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल.


 18 जुलैला कुख्यात गुंड गुड्ड्या याची निर्घृण हत्या झाली. कसायालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने गुड्ड्याचा खातमा करण्यात आला. जवळपास सर्वच मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 


या प्रकरणी विलास गोयर, विजय गोयर, विक्की गोयर, शाम गोयर, राजा उर्फ भद्रा देवर, भीमा देवरे, यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.  त्यात खूनाची ’क्लिप’ सर्वच ठिकाणी व्हायरल झाली आहे. 


ती यू-ट्यूबवरही जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे. आरोपींची माहिती मिळाल्यास धुळे जिल्हा नियंत्रण कक्षाला (02562- 288211, 228212, ) कळवावं असं आवाहन करण्यात आलंय