धुळे: आमदार अनिल गोटे यांच्या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या धुळे महानगरपालिकेसाठी रविवारी मतदान पार पडले. पालिकेच्या एकूण ७४ जागांसाठी सुमारे ६० टक्के इतके मतदान झाले. मतदानानंतर राजकीय तज्ज्ञांनी धुळ्यात यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा कौल दिला आहे. मात्र, भाजप याठिकाणी सर्वात मोठा पक्ष ठरेल. या पार्श्वभूमीवर काही प्रभागांमधील निकाल निवडणुकीचे पारडे फिरवणारे ठरू शकतात. या जागांवर बाजी मारणाऱ्या पक्षाकडे पालिकेची सूत्रे जाऊ शकतात. 
 
 
तेजस गोटे - गोटे हे लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार आहेत. हे आमदार अनिल गोटे यांचे चिरंजीव आहेत ते प्रभाग क्रमांक एक मध्ये उभे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिभा चौधरी - या प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे उमेदवार आहेत  यांच्यात मला वरती  आमदार अनिल गोटे यांनी  जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.  चौधरी या भाजप उमेदवार आहेत.


हेमा गोटे - या लोकसंग्रामच्या महापौर पदाच्या उमेदवार असून, त्या आमदार अनिल गोटे यांच्या पत्नी आहेत. त्या माजी नगराध्यक्षाही होत्या. हेमा गोटे या प्रभाग क्रमांक पाचमध्ये उभे आहेत. 


भारती मनोज मोरे - या मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांच्या पत्नी आहेत. मनोज मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अचानक भाजपमध्ये आले.  मोरे आणि आमदार गोटे यांचे हाडवैर आहे. मोरेंच्या प्रवेशा वरूनच भाजपा आणि आमदार गोटे यांच्यातला दुरावा वाढला.


चंद्रकांत सोनार -  सोनार हे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर गुंडगिरीचे आरोप आहेत. शिवसेना राष्ट्रवादी आणि आता भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय गुजराती आहेत. गुजराती यांना आमदार अनिल गोटे यांनी पाठिंबा दिला आहे.


देवेंद्र सोनार उर्फ देवा - हा प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचा उमेदवार आहे. देवाच्या प्रवेशावर भाजपवर गुंडाना प्रवेश देऊन उमेदवारी दिल्याचा आरोप झाला आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत .पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे .मात्र तरुण वर्गात प्रसिद्ध आहे.


फारुख शहा- हे प्रभाग क्रमांक १३ मध्ये रासपच्या तिकिटावर उमेदवार आहेत. माजी उपमहापौर आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर मात्र मुस्लिम समाजामध्ये भाजपबद्दल असलेली नाराजी लक्षात घेऊन त्यांनी रासपचे चूल मांडली.


कल्पना महाले  - महाले या प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. त्या विद्यमान महापौर आहेत. गेल्या दोन वर्ष पासून वर्षापासून महापौरपदी विराजमान आहेत.


मायादेवी परदेशी - या राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये आल्या आहेत. त्या प्रभाग क्रमांक ८ मध्ये उमेदवार आहेत. त्यांचा मुलगा विकी परदेशी हा तडीपार करण्यात आला आहे.


दीपक खोपडे उर्फ बंटी भाऊ - हे प्रभाग क्रमांक १४ चे भाजप उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते भाजपात आले आहेत. माजी स्थायी समिती सभापती राहिलेल्या खोपडे यांनी आणि वेळेस भाजपची उमेदवारी मिळवली आहे.


सिद्धार्थ करनकाळ - सिद्धार्थ करनकाळ हे  प्रभाग क्रमांक ९ मध्ये उभे आहेत. ते शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. प्रथम महापौर प्रथम महापौर भगवान करनकाळ यांचे ते चिरंजीव आहेत.


शितल नवले - नवले हे प्रभाग क्रमांक १७ मध्ये होगया आहेत. ते माजी महापौर मोहन नवले यांचे चिरंजीव आहेत. मोहन नवले हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता निवडणुकीच्या तोंडावर शितल नवले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शितल यांच्याकडे भाजपचा महापौर पदाचा उमेदवार म्हणून पाहिला जात आहे. ते उच्चशिक्षित असून त्यांची वैयक्तिक प्रतिमा उजळ आहे.


उमेर अन्सारी - उमेर अन्सारी है उपमहापौर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खंदे समर्थक म्हणून त्यांच्या वडिलांची ओळख आहे. सवाल अन्सारी हे त्यांचे वडील असून ते देखील उपमहापौरपद उपभोगून चुकले आहेत. तरुण आणि उच्चशिक्षित म्हणून उमर यांच्याकडे पाहिले जाते.


नरेंद्र परदेशी - नरेंद्र परदेशी हे प्रभाग क्रमांक सात मध्ये उमेदवारी करीत आहेत. ते शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. अतिशय आक्रमक अशी त्यांची प्रतिमा आहे. महानगरपालिकेच्या कारभाराचा बारीक अभ्यास त्यांचा आहे.


संजय गुजराती - संजय गुजराती है प्रभाग क्रमांक ९ मध्ये उभे आहेत. भाजप उमेदवार चंद्रकांत सोनार यांच्या समोर ते उमेदवारी करीत आहेत. त्यांना आमदार अनिल गोटे यांनी पाठिंबा दिला आहे. गुजराती हेदेखील शिवसेनेचे महानगरप्रमुख आहेत. विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी उपभोगला आहे.


प्रदीप कर्पे - प्रदीप करते है प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपचे उमेदवार आहेत. करपे हे रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तीयांमध्ये असल्याचं बोललं जातं. ते आधी शिवसेनेमध्ये होते करपे नगरसेवकही राहून चुकले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे महेश मस्त महेश मिस्त्री यांचे आव्हान आहे.


संजय जाधव - जाधव हे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भाजपचे उमेदवार आहेत. ते अधिक भाजपमध्ये होते. त्यानंतर शिवसेनेत नगरसेवक म्हणून निवडून आले. आणि आता पुन्हा भाजपचे उमेदवार आहेत जाधव यांचे भाऊ सुधीर जाधव हे शिवसेनेचे नेते आहेत. सुधीर जाधव हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.


महेश मिस्त्री - हे प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर प्रदीप कर्पे हे भाजपच्या उमेदवार आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून मिस्त्री यांची ओळख आहे.