धुळे : धुळे महापालिका प्रशासनाविरोधात चक्क सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली. प्रशासन नगरसेवकांना किंमत देत नाही, प्रशासनाचं आडमुठी धोरण, गलथान कारभार अशा विविध कारणांसाठी भाजप नगरसेवकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केलं. तब्बल तीन तास नगरसेविका शीतल नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. माझे आरोप खोटे निघाल्यास मी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच फाशी घेईन, असा इशाराच शितल नवले यांनी प्रशासनाला दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भ्रष्टाचारामुळे विकास कामांना वेळ मिळत नसल्याने नागरिकांचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप नगरसेवक शीतल नवले यांनी यावेळी केला.


धुळे महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर विकास कामांना वेग मिळेल आणि त्यातून शहराचा कायापालट होईल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत होता. मात्र गेल्या दीड वर्षापासून धुळे शहरातील सार्वजनिक शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली असून याबाबत प्रशासनाला वारंवार सांगून देखील ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. शहरातील मिल कामगारांचा असलेल्या प्रभात तसेच मुस्लिम परिसरातील शौचालयांची प्रचंड दुरावस्था झाली आहे यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून परिसरात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.