प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील अनेक नागरिकांची नाव मतदार यादीतून वगळली गेली आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांना विचारल असता त्यांच्याकडून उलटसुलट उत्तरं दिली. 'कुठेही तक्रार करा' असं तक्रार करायला गेलेल्यांना कर्मचाऱ्यांनी सांगितलं गेलं. नागरिकांनी तब्बल अडीच हजारांच्या घरात हरकती नोंदवून पालिका प्रशासनाची लक्तर वेशीवर टांगली आहेत.


कर्मचाऱ्यांची अरेरावी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या तीन लाख २९ हजार मतदारांच्या धुळे शहरात मतदार यादींवर दोन हजार ४१६ हरकती नोंदवल्या गेल्या आहेत. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली आणि त्या दरम्यानच हा गोंधळ सुरु झालायं. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी योग्यपद्धतीने मैदानात उतरून मतदार याद्या तयार केल्या नसल्याने एवढ्या प्रचंड प्रमाणात हरकती नोंदविल्या गेल्या आहेत.


अनेक ठिकाणी तर प्रभागातील हजारोनी मतदारांची नाव या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात वळवली गेली आहेत. मतदार याद्यांच्या चुकांबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला तर ते थेट आयुक्तांकडे तक्रार करा असा सूर लावताय.


'मतदानाचा हक्क जाणार'


 महापालिकेच्या निवडणुकीत या मतदार याद्यांचा घोळ राजकीय समीकरण बदलणारा ठरणार आहे. अनेकांची नाव तर हेतुतः वगळली गेल्याची चर्चाही शहरात आहे. असं असलं तरी आयुक्त मात्र प्रचंड प्रमाणात आलेल्या हरकती विशेष नसल्याचे सांगताय. योग्य तक्रारींची दखल घेण्याची शेखीही ते मारताय.


मतदार याद्या तयार करत असताना निवडणूक आयोगाची थोडीही भीती कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नव्हती. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात गोंधळ उभा झालायं.


हलगर्जीपणाचा कळस गाठणाऱ्या महापालिकेला मात्र मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला जाणार आहे याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र सध्या दिसतयं.