धुळे :  मद्यधुंद अवस्थेतील तरुणीने धुळ्यातील नरडाण्यात तुफान राडा केला. गस्तीवर असलेल्या पोलिसांना तरुण आणि तरुणी संशयास्पद आढळून आले. त्याबाबत चौकशी केल्याच्या रागातून मद्यधुंद महिलेने रस्त्यावरच पोलिसांशी हुज्जत घातली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई  आग्रा महामार्गालगत नरडाणा येथे अलका पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले. त्यांच्या संशयास्पद बडबडीमुळे पोलिसांनी चौकशी केली.  त्या रागातून मद्यधुंद तरुणीने पीएसआय शरद पाटील  यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. पोलिसांनी संयम दाखवत महिलेला आवर घातला. 


ही तरुणी इतकी नशेत होती की, तीने पोलिसांना अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवीगाळ सुरू केली.  या तरुणीच्या नौटकीमुळे सुमारे तासभर वाहतुक देखील खोळंबली  होती. 


दरम्यान, महिला पोलीस तेथे आल्या आणि त्यांनी या तरुणीला आवर घातला.  त्यावेळी  तरुण आणि तरुणी दोघांनी मद्यपान केले असल्याचे लक्षात आले. 


तरुणीने पोलिसांची कॉलर पकडल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.