धुळ्यातील लष्कराच्या जवानाला सिक्कीमध्ये वीरमरण; पार्थिव दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु
Dhule News : धुळ्यातील जवानाला वीरमरण आल्याने संपूर्ण शिरपूर वाघाडीवर शोककळा पसरली आहे. धुळे सैनिक कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. मनोज माळी यांचे पार्थिव बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळे जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी येथील भारतीय सैन्यातील (Indian Army) जवान मनोज माळी (Manoj Mali) यांना वीरमरण आले आहे. सिक्कीम (Sikkim) येथे कर्तव्य बजावत असताना मनोज माळी यांना विरमरण आलं आहे. मनोज माळी यांच्या आकस्मित जाण्याचे शिरपूर वाघाडीत शोककळा पसरली आहे.
मनोज माळी हे सिक्कीम येथे एका ओपी पोस्टवर कार्यरत होते. अन्य जवानांसोबत आपल्या पोस्टवर जात असतानाच मनोज माळी हे दरीत पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मनोज माळी यांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मनोज यांच्या मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धुळे सैनिक कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.
मनोज हेसर्वोत्कृष्ट एनसीसी कॅडेट होते. चार वर्षांपूर्वी ते सैन्यात भरती झाले होते. सिक्कीमच्या अवघड स्थितीत ते चोखपणे आपले देश संरक्षणाचे काम करत होते. त्यांच्या वीरमरणामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मनोज माळी यांचे पार्थिव गावाकडे केव्हा आणले जाणार हे अद्याप स्पष्ट नाही.