धुळे : अॅमेझॉन कंपनीकडे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलची बुकिंग केल्यानंतर आलेले पार्सल परस्पर कटरने कापून त्याजागी नकली मोबाईल ठेवून फसवणूक करणाऱ्यां टोळीच्या धुळे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी रामदयाल मौर्या, रूपेश सुपे, एजाज खान, राहुल निकम यांना अटक केली असून त्यांच्याकडून एक कारसह सुमारे १० लाख रुपये किंमतीचे महागडे मोबाईल जप्त केले आहेत.


ही चौघांची टोळी मोबाईलची ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर येणारे पार्सल हे परस्पर मिळवत असत. यानंतर  कटरच्या मदतीने खोका कापून त्यातील मोबाइल काढला जात होता त्या जागी डमी मोबाइल ठेवून पार्सल पुन्हा कंपनीकडे परत पाठवले जात होते. शिवाय बुकिंगच्या वेळी दिलेली रक्कमही कंपनीकडून परत मागवून ऑनलाईन कंपनीची दुहेरी  फसवणूक करत होते. या कारवाईमुळे ऑनलाईन कंपन्यांची फसवणूक करून लूट करणाऱ्यां टोळीचा गोरखधंदा समोर आला असून धुळे पोलीस अधिक तपास करीत आहे.