धुळे : बातमी आहे झी 24 तास इम्पॅक्टची. झी 24 तासने धारावीनंतर आणखी एका बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. यानंतर पोलीस यंत्रणा एक्शन मोडवर आली. धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा समावेश होता. पोलिसांनी या प्रकरणी धुळे महानगरपालिकेचा आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरेला अटक केली आहे. (dhule police arrested to health officer dr mahesh more in fake vaccination certificate scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांसोबत जाणारा हा आरोपी कुख्यात गुंड किंवा मवाली नाही. मात्र त्यानं केलेला कारनामा एखाद्या गुंडापेक्षाही कमी नाही. महापालिकेतील आरोग्य अधिकारी. बोगस लसीकरण प्रमाणपत्र प्रकरणी पोलिसांनी महेश मोरेला बेड्या ठोकल्या आहेत. 



बोगस प्रमाणपत्र देणारी चौकडी


महेश मोरे, त्याचा सहकारी डॉ. प्रशांत पाटील, उमेश पाटील आणि अमोल पाथरे या चौघांनी धुळे शहरात लसीकरणाचं एक बोगस केंद्र सुरू केलं होतं. इच्छुकांना या केंद्रातून लसीकरणाचं बोगस प्रमाणपत्र दिलं जायचं. त्याबदल्यात त्यांच्याकडून हजारो रूपये घेतले जायचे. झी 24 तासनं या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी मुख्य सुत्रधाराला अटक केली. 


केवळ धुळे जिल्हाच नव्हे, तर अगदी मालेगावातील लोकांनाही या टोळक्यानं बोगस प्रमाणपत्र दिल्याचं झी २४ तासनं उघड केलं होतं. मोरेच्या अटकेतून भ्रष्टाचारी कीड आरोग्यविभागात किती खोलवर पोहचलीये हे स्पष्ट होतंय. आता याप्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात कुठे कुठे विणले गेलेत याचा शोध पोलीस घेत आहेत.