धुळे : संपूर्ण परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला धुळे जिल्ह्यात अक्षरशः जिवंत पकडण्याचं धाडस एका पोलीस कर्मचाऱ्यानं करुन दाखवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळ्यातल्या निजामपूर इथे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यानं जीवावर उदार होऊन हे अचाट शौर्य करुन दाखवलं. या बहादूर पोलीस कर्मचाऱ्यानं बिबट्याला आपल्या हाताच्या मिठीत दाबून धरले. सुदैवाने हा बिबट्या या कर्मचार्याच्या हातात असा काही फसला की त्याला स्वतःची सुटका करून घेणं अशक्य होऊन बसलं. त्यानंतर वन विभाग आणि पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी त्याच्या मदतीला धावले आणि सर्वांनी मिळून या बिबट्याला एका पोतडीत बंद केलं.



पुढे या बिबट्याला पिंजऱ्यात टाकण्यात आलं. निजापूर परिसरातल्या जामकी शिवारात अंगावर काटा आणणारा हा थरार घडला. दरम्यान या घटनेत एक वन कर्मचारी जखमी झाला आहे. रात्री उशीरा या बिबट्याला लळींग कुरणात सोडण्यात येणार आहे.