COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे : मुलं चोरणारी टोळी समजून ५ जणांना बेदम मारहाण करण्याची घटना समोर येत आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. धुळ्यातील राईनपाडा गावात ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात आणि गावात दहशतीचं वातावरण पसरल आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेयतं. राईनपाडा हा ग्रामीण भाग आहे. गावकऱ्यांनी या ५ जणांना पकडल...जशी बातमी पसरली आणि बघता बघता गर्दी झाली. जमावानेही ५ जणांना मारहाण करायला सुरूवात केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झालायं.


मॉब सायकोलॉजी 


याआधी औरंगाबाद आणि नंदुरबारमध्ये अशा घटना बाहेर आल्या होत्या. संशयित माणून दिसला की लोकही त्याला थेट मारहाणचं करतो. त्याची चौकशी करण्याची कोणी तसदी घेत नसल्याचेही समोर आलंय. यांचा दोष नसताना मारहाण झाल्याचे प्रकार समोर आलंय. या प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. लोकांमध्ये जनजागृती होण्याची गरज आहे. लोकांमध्ये ऐकून घेण्याची मानसिकता नाही. मॉब सायकॉलॉजीमुळे एकाने मारहाण केल्यास सर्वजण त्याच्यावर तुटून पडतात. माणूसकीला काळीमा फसणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.