धुळे : धुळ्यात जिल्हा परिषद भाजपच्या पारड्यात पडल्यात जमा आहे. मात्र धुळ्यातील हा निकाल भाजपचा नसून काँग्रेसयुक्त भाजपचा विजय असल्याचं मत माजी आमदार अनिल गोटे व्यक्त केलं आहे. भाजपने पाण्यासारखा पैसा वाटला त्यामुळे पैशांनी त्यांनी हा विजय मिळवला आहे. माझ्याकडे त्याचे व्हिडीओ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नाही तर धुळ्याच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो,  नागपूर, नंदुरबारच्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेतील का? असा सवाल सुभाष भामरेंना विचारलाय.


धुळे महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून माजी आमदार अनिल गोटे आणि माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यात राजकीय चढाओढ सुरू आहे. अनिल गोटे यांनी मागील निवडणुकीतही भाजपशी संघर्ष सुरूच ठेवला होता.