मोठा निर्णय! ग्रामीण भागातही डायलिसिसची सेवा उपलब्ध
75 ग्रामीण रुग्णालयांत मिळणार डायलिसिस सेवा
मुंबई: ग्रामीण भागांमध्ये अनेकवेळा अपुऱ्या सुविधांमुळे शहराची किंवा मोठ्या रुग्णालयांची वाट धरावी लागते. खर्च आणि सगळ्याच गोष्टींचा विचार करता अशावेळी अपुऱ्या सुविधांचा फटका नागरिकांना बसतो. अशा नागरिकांसाठी आता दिलासा देणारी आणि चांगली बातमी आहे.
ग्रामीण भागात डायलिसिसची सेवा उपलब्ध होणार आहे. 75 ग्रामीण रुग्णालयामध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी खर्चाची विशेष तरतूद करण्यात आली आहे. 80 हजारांहून अधिक वेळा डालिसिस करता येणार आहे. ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’च्या माध्यमातून खर्चाची तरतूद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, मुंबईसह कोकणातील महिलांसाठी चांगली बातमी
राज्यातील ग्रामीण भागातही मूत्रपिंड विकाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तिथल्या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी २० कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च येणार असून ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’च्या माध्यमातून हा खर्च केला जाणार आहे.